Monday, September 14, 2015

सिंहस्थ कुंभमेळा एकविसाव्या शतकातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव


कुंभमेळा म्हणजे? 
कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत वैश्विक उत्सव किंवा मोठी धार्मिक यात्रा. कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे दर्शन तसेच संतसंग देणारे आध्यात्मिक संमेलन म्हणूनही ओळखले जाते. गुरूला राशीचक्र भोगण्यास १२ वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक १२ वर्षांनी कुंभयोग येतो, असे ग्रंथांमध्ये नमूद आहे. कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभाही होतात. त्यात अनेक विद्वान, संन्यासी, विविध पिठांचे शंकराचार्य, १३ आखाड्यांचे साधू, संत, महात्मा आणि महामंडलेश्वर यांची उपस्थितीत प्रमुख असते.
दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो.
भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यांत हजेरी लावतात पवित्र गंगा नदीत स्नान करतात. .. २००१ साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात अधिकृत अंदाजांनुसार ते कोटी भाविकांनी भाग घेतला

आख्यायिका पौराणिक संदर्भ
श्री गोपाळदत्त शास्त्री महाराज हे रामानुज संप्रदायाचे प्रमुख आहेत. 'कुंभ महात्म्य' हे त्यांचे स्वलिखीत पुस्तक. त्यांनी यात कुंभमेळ्याविषयी महर्षि दुर्वासांची कथा, कद्रू-विनताची कथा समुद्रमंथनाची कथा या तीन प्रचलित कथांचा समावेश केला आहे. त्या पुढील प्रमाणे... 

1)या कथेत इंद्रदेव आणि दुर्वासा ऋषी यांचा प्रसंग आला आहे. दुर्वासा ऋषींनी दिलेल्या दिव्य पुष्पहाराचा इंद्रदेवाकडून अपमान झाला होता. तो अपमान ऋषींना सहन झाला नव्हता. सविस्तर कथा अशी की, इंद्रदेवांची हत्तीवरून स्वारी निघाली होती. तेव्हा दुर्वासा ऋषींनी त्यांना पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले होते. मात्र इंद्रदेवाने तो पुष्पहार हत्तीच्या मस्तकावर ठेऊन दिला. नंतर हत्तीने तो पुष्पहार जमीनीवर टाकून पायाने कुचलला होता. त्याचा दुर्वासा ऋषींना खूप राग आला. त्यांना इंद्रदेवाला शाप दिला. शापाचा परिणाम इतका झाला की, सगळीकडे हाहाकार माजला. दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली. प्रजा त्राही-त्राही झाली. नंतर देवांनी समुद्र-मंथन केले त्यातून लक्ष्मी प्रकटली, वृष्टी झाली त्याने शेतकरीवर्ग सुखावला. 
समुद्रमंथनातून अमृतकलश बाहेर आले होते. ते राक्षसांनी पळवून नागलोकात लपवून दिले. तेथे गरुडाकडून त्याचा उध्दार झाला त्यानेच ते क्षीरसागरापर्यंत पोहचविले. क्ष‍ीरसागरापर्यत पोहचण्यात गुरूडाने ज्या चार ठिकाणी अमृतकुंम ठेवले होते. ते चार ‍स्थळ म्हणजे त्र्यंबकेश्वर, उज्जैन, प्रयाग, हरिद्वार हे होय. त्यामुळे हे चार तीर्थक्षेत्रावर कुंभमेळा भरतो.

2)सिंह राशीत जेव्हा गुरुचे आगमन होते त्यावेळी नाशिकमध्ये हा कुंभमेळा भरतो... ग्रहांची ही स्थिती दर बारा वर्षांनी येते. या कुंभाची रंजक अशी पौराणिक कथा सांगितली जाते. देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथन सुरु असताना दानव आक्रमक झाले. त्यावेळी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून राहूच्या हातातून अमृत कलश हिसकावून घेतला आणि इंद्राचा मुलगा जयंत याच्याकडे सोपविला. तो कलश घेऊन जयंत स्वर्गाच्या दिशेने जात असताना त्याने हरिद्वार, उज्जेन, अलाहाबाद, नाशिक अशा चार ठिकाणी तो कलश ठेवला असता अमृताचे काही थेंब खाली पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावेळी जी ग्रहस्थिती होती तशी ग्रहस्थिती दर बारा वर्षांनी येते आणि त्यावेळी त्या-त्या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो

3)समुद्रमंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला, की जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले, सूर्याने अमृतकलशास फुटू दिले नाही बृहस्पतीने राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र गुरू कुंभ राशीत प्रवेशतात तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा गुरू आणि सूर्य सिंह राशीत प्रवेशतात आणि अमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.

4)त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थात अस्थिंचा विलय होतो असं मानलं जातं. श्रद्धादिक कर्मे कुशावर्त तीर्थावर केल्याने पितरांचा उद्धार होतो असे धर्मग्रंथ सांगतात. श्रीराम वनवासात असताना पंचवटीत त्यांचा मुक्काम होता. तेव्हा कश्पयऋषींनी श्री रामाला त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थावर जाऊन पितरांच्या मुक्तीसाठी श्रद्धादिक कर्मे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार श्रीरामाने इथे हे कर्म केले.

भारतीय संस्कृतीत कुंभमेळ्याचे खूप महत्त्व आहे. पुरणानुसार हा एकमात्र मेळावा, सण उत्सव आहे की त्यात मानवतेचा संगम झालेला दिसतो. हिंदुबांधव एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करता. भारतीय संस्कृतीत ही परंपरा फार प्राचीन आहे. त्याचा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. प्राचीन काळी ऋषीमुनी नदीकाठी एकत्र येऊन मोठे अध्यात्मिक कार्य करत असत तसेच एखाद्या रहस्यावर विचार विनीमय करत असत. आजही ही परंपरा कुंभमेळ्याच्या रूपाने सुरू आहे. संपूर्ण भारतातून लाखो भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी हजेरी लावत असतात.
कुंभमेळा आयोजनामागे वैज्ञानिक कारण असू शकते. कारण जेव्हा जेव्हा कुंभमेळ्याला सुरूवात होते. तेव्हा सूर्यामध्ये काही ना काही बदल होत असतो आणि त्याचा परिणाम पृथ्वीवर जाणव असतो. प्रत्येक अकरा, बारा वर्षांच्या अंतराने सूर्यमध्ये परिवर्तन होत असते.


गंगा-गोदावरी मंदिर
नाशिकला रामकुंडावर श्री गंगा-गोदावरी मंदिर आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर फक्त सिंहस्थाच्या १३ महिन्यांच्या कालावधीतच उघडले जाते. उर्वरित ११ वर्षे ते बंद असते. ध्वजारोहणानंतर आज त्याचे कुलूप उघडेल. मंदिराचे मुख्य पुजारी अनंत जोशी यांच्या माहितीनुसार गौतमी ऋषींच्या हातून ब्रह्महत्येचे पातक झाले. त्यावर उःशाप म्हणून त्यांना श्रीशंकराच्या जटेत वास्तव्य करणाऱ्या गंगेतील स्नानाने पातक दूर होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे गौतम ऋषींनी तपश्‍चर्या करत श्रीशंकराला प्रसन्न केले. मात्र, गंगा जटेतून बाहेर पडण्यास तयार होईना. त्या वेळी तिला दर बारा वर्षांनी सर्व देव, संत, महंत विविध ठिकाणचे तीर्थ अर्पण करून गोदावरीचा सन्मान करतील. या वचनानंतर तेव्हापासून दर बारा वर्षांनी सिंहस्थाला गोदावरी पूजनाची प्रथा सुरू झाली. त्याचे प्रतीक म्हणून एक तपाने हे मंदिर उघडले जाते.

धर्मध्वज
भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये कोणतेही शुभकार्य करताना त्याची सुरवात ध्वजारोहणाने होते. म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याचे धर्मध्वजारोहण म्हणजे एक प्रकारचे मंगलाचरणच आहे. कोणत्याही कार्याची सुरवात मंगलचरणानेच होते. म्हणून विश्‍वकल्याणासाठी, देश कल्याणासाठी आणि नगरवासी जनांच्या कल्याणासाठी संकल्पपूर्वक ध्वजारोहण करावे, असे पुराणांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आज होत असलेल्या सिंहस्थ कुंभपर्व सिंहध्वजाचे पूजन करून गोदातीरी येत असलेल्या देवतांचे स्वागत करत आहे. या सिंहध्वजावर सर्व प्रकारची विद्यातत्त्वे, शिवतत्त्वे, विष्णूतत्त्वे, ब्रह्मतत्त्वे आत्मतत्त्वे अशा सर्व प्रकारच्या तत्त्वांचा वास असतो. पुराणात असे म्हटले आहे, की
यत्रैतत्‌ क्रियते राष्ट्रे ध्वजयष्टिनिवेशनम्‌ |
नाकालमृत्युस्तत्रास्ति नालक्ष्मीः पापकृत्स्वपि ||
ज्या राष्ट्रांत ब्रह्मदंडपूर्वक धर्मध्वजाचे आरोहण केले जाते विधियुक्त पूजन केले जाते, त्या राष्ट्रात प्रजाजन दुःखी होत नाही. दरिद्री होत नाही. रोगी होत नाही. तसेच ते पापमुक्त होतात. धनधान्य, ऐश्‍वर्य, वंशवृद्धी आदींनी समृद्ध होतात. तसेच
कृते महाध्वजारोहो तत्रापि चलिताश्‍च ये |
शिल्पिनो नायका भृत्या भृतिभाजोडपि तारयेत्‌ || 

सिंहस्थ कुंभपर्व हा कुणा एका माणसाचा नसून सर्वांचाच लोकोत्सव आहे. म्हणून हे महाध्वजारोहण सर्वांचेच आहे. या ध्वजारोहणाने सर्वांचेच कल्याण योजिले आहे. तसेच या राष्ट्रात पर्वकाळांच्या निमित्ताने, उत्सवांच्या निमित्ताने, यज्ञाच्या निमित्ताने केले जाणारे ध्वजारोहण हे राष्ट्राच्या राज्यकर्त्यांचे, प्रजाजनांचे कल्याणकर्ते आणि त्यांना विजय मिळवून देते. तसेच इतर पशू-पक्षी, प्राणी, पर्यावरण यांनाही समृद्ध करते. वायुमंडल शुद्ध करून ध्वजावरील वारा जिथपर्यंत पोचतो त्या सर्व परिसरातील अरिष्ट दूर होते. जेथे धर्मध्वजाची स्थापना केली जाते, त्या धर्मक्षेत्रावरील मातीसुद्धा सुगंधित होऊन त्या मातीचे रजकण जे भक्तिभावाने आपल्या मस्तकी लावतात, ते सर्व जण पापमुक्त होतात. जे या धर्मध्वजाची प्रदक्षिणा करतात, त्यांना ऐश्‍वर्य प्राप्ती होते. अंतः स्वर्गाचीदेखील प्राप्ती होते, असे हे सिंहस्थ धर्मध्वजाचे महात्म्य आहे.   

ध्वजरोहण 14 जुलै 2015  
ध्वजा वितरण 11 ऑगस्ट 2016
सिंहस्थ ध्वज दंडाची उंची 51 फुट
सिंहस्थाच्या पितळीध्वजाचे वजन 501 किलो
अनीच्या ध्वजाची उंची 52 फुट

आखाड्यांची नावे
कुंभमेळ्यातील सर्व आखाड्यांची राहण्याची व्यवस्था साधुग्राम मध्ये केलेली आहे हे साधुग्राम 335 एकर मध्ये नाशिक मधील तपोवन परिसरात वसलेले आहे अगदी प्राधिकरणा प्रमाणे 1A ते 2Eअशी सेक्टर तयार करुण त्यामध्ये नंबर चे ब्लाक तयार केलेले आहे प्रत्येक आखाड्यानेखा आपल्या वर्चस्व दाखवण्यासाठी नयनरम्य असे माहलाप्रमाणे दिसणारे सभामंडप तयार केलेले आपल्याला पाहायला मिळतात.
 
नाशिक येथे वैष्णव पंथाचे तीन आखाडे असतात. त्यात श्रीदिगंबर आखाडा, श्रीनिर्मोही आखाडा, श्रीनिर्वाणी आखाडा यांचा समावेश आहे. तर, त्र्यंबकेश्वर येथे शैव पंथाचे दहा आखाडे आहेत. त्यात श्रीपंच दशनाम जुना आखाडा, श्रीपंचनाम अवाहन आखाडा, श्रीपंच अग्नि आखाडा, श्रीनिरंजनी आखाडा, श्रीतपोनिधी आनंद आखाडा पंचायती, श्रीपंचायती आखाडा महानिर्वाणी, श्रीपंचायती अटल आखाडा, श्रीपंचायती आखाडा बडा उदासीन, श्रीपंचायती आखाडा नया उदासीन, श्रीपंचायती आखाडा निर्मल यांचा समावेश आहे. 


श्री निरंजनी आखाडा
हा आखाडा संवत ९६०, सन ८२६ मध्ये सोमवार रोजी मांडवीकच्छ येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव कार्तिक स्वामी आहेत.

श्री.जुनादत्त (भैरव) आखाडा
हा आखाडा संवत १२०२, सन १०६९ मध्ये कार्तिक शुक्ल १० रोजी कर्णप्रयाग येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री रुद्रावतार दत्तात्रय आहेत.

श्री महानिर्बाणी आखाडा
हा आखाडा संवत ८०५, सन ६७१ मध्ये मार्गशीर्ष शुक्ल १० गुरुवार, रोंजी झारवंड वैजनाथ प्रांत बिहार येथे स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री कपील महामुनी आहेत.

श्री आनंद आखाडा
हा आखाडा संवत ९१२, सन ७७८ मध्ये स्थापन झाला. यांचे इष्टदेव श्री अग्नि सूर्य आहे.

श्री पंच अग्नि आखाडा
हा आखाडा संवत ११९२, सन १०५८ मध्ये आषाढ शुक्ल ११ रोजी स्थापन झाला. यांची इष्ट देवता गायत्री आहे. यांच्यात चार शंकराचार्यंपीठाचे ब्रम्हचारी साधु आहेत महामंडलेश्वर आहेत.

श्री नाथपंथी गोरक्षनाथ मठ (आखाडा)
हा आखाडा संवत ९००, सन ८६६ मध्ये अहिल्या गोदावरी संगमावर स्थापन झाला. यांचे संस्थापक पीर –पीर शिवनाथजी आहेत. आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ असे योगी झाले. याचे मुख्यदैवत गोरक्षनाथ (भैरव) आहे. यांच्यात बारापंथ आहेत. यांचेमधील अनेक योग्यांनी , ब्रम्हगिरी, कौलगिरी, येथे साधना केली.

श्री वैष्णव बैरागी आखाडा
हा बालानंद वैष्णव आखाडा संवत १७२९, सन १५९५ मध्ये दारागंज येथे श्रीमध्व मुरारी यांनी स्थापन केला. कालांतराने यांचे चार संप्रदाय झाले. त्यात निर्मोहि निर्वाणी, खाकी असे भेद आहेत. प्रत्येक कुंभ क्षेत्रावर यांचे स्नान संन्याशी दशनामी साधुंचे शाहीस्नान झाल्यावर होत असते.

श्री उदासिनी पंचायती बडा आखाडा
हा आखाडा संवत १८४४ ,सन १७१० मध्ये स्थापन झाला. या सांप्रदाचे संस्थापक श्रीचंद्र आचार्य उदासीन होते. यांच्यात आज नऊ असे एकत्रित सांप्रदायिक भेद आहेत.

श्री उदासीन नया आखाडा
हा आखाडा संवत १९०२,सन १७६८ मध्ये वरील उदासीन बडा आखाड्यातील कांही साधुंनी विभक्त होऊन स्थापन केला. यांचे प्रवर्तक महंत सुरदासजी होते.

श्री निर्मल पंचायती आखाडा
हा आखाडा संवत १९१८, सन १७८४ मध्ये हरिद्वार कुंभाचे वेळी एक मोठी सभा घेऊन विचारविनियम करून श्री दूरगाहसिंह महाराज यांनी स्थापन केला. यांचे इष्टदेव गुरुनानक ग्रंथसाहेब आहेत.

शाहीस्नानाची अनोखी परंपरा 
कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी विविध आखाड्यांतील साधूसंतांनी ठरवून घेतलेल्या क्रमाने स्वतःच्या आखाड्यातील साधूसंत अन् शिष्य यांच्यासह स्नान करणे, याला पवित्र स्नान (शाही स्नान), असे म्हटले जाते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुंभमेळ्याच्या पवित्र स्नानास आरंभ होतो. शाहीस्नानाला जाण्यासाठी आखाड्यातील साधूसंतांची शस्त्रांसह मिरवणूक निघते, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही अंगांनी अफाट जनसमुदाय जमतो. स्थानिक भाविक लोक आधीच मिरवणुकीचा मार्ग रांगोळ्या आणि फुलांच्या पाकळ्या यांनी सजवतात. त्यानंतर या मार्गावरून एक-एक आखाडा, त्यांचे संतमहंत आणि शिष्य, हत्ती, उंट, घोडे अशा परिवारासह थाटात आणि वाद्यांच्या तालावर पवित्र तीर्थाकडे जातात. काही स्वामी हत्तीवरून, तर काही ट्रॅक्टर ट्रॉलीवर उभारलेल्या रथावर आरूढ झालेले असतात. त्यांचे अनुयायी त्यांच्या मस्तकावर छत्र धरतात, तर भाविक त्यांच्यावर फुले उधळतात. यावेळी ढोल, ताशे, नगारे इत्यादी वाद्यांचे नाद आणि 'हर हर शंकर, गौरी शंकर, हर हर महादेव।' आणि 'जय गंगामैय्याकी जय।' या घोषणा दुमदुमतात. अंगाला भस्म फासलेले सहस्त्र नग्न साधू गळ्यात फुलांच्या माळा, हातात तळपत्या तलवारी किंवा इतर शस्त्रे आणि ध्वजपताका घेतात. अंगाला भस्म फासल्यामुळे अमानवी आकृत्या वाटत असलेले सहस्त्रांहून अधिक नागा साधू 'हर हर महादेऽऽव', 'हर हर गंगेऽऽ', असा घोष करतात, तेव्हा आपण एखादे जिवंत चित्र पहात असल्याचा भास होतो. हा सारा नजारा अविस्मरणीय असाच असतो.कुंभस्थळी १० हजाराहून अधिक मंडप घातले जातात आणि त्यातील बहुतेक मंडपांत धार्मिक विषयांवर प्रतिदिन निरूपण होत असते. सतसंग आणि प्रवचनांनी कुंभकाळ अतिशय समृद्ध बनतो. तर कुंभमेळ्यातील प्रत्येक संप्रदायाच्या मंडपामध्ये किंवा आखाड्यामध्ये अहोरात्र भाविकांसाठीचे अन्नछत्र सुरु असते. 

आखाड्यांतील प्रतिष्ठेचा वाद
अखिल भारतीय आखाडा परिषदेची मान्यता असलेले १३ आखाडे आहेत. त्यात शिवभक्त आणि वैष्णव अशी सरळ सरळ विभागणी झाली आहे. शिवभक्त षड्‌दर्शन आखाड्याचे नागा साधूंचे जुना दत्ता, निरंजनी, अग्नी, आनंद, निर्वाणी, आवाहन, अटल आवाहन, जुना उदासीन, निर्मल पंचायती, असे दहा आखाडे आहेत. दुसरा गट विष्णुभक्त. दिगंबर, निर्मोही आणि निर्वाणी, असे तीन आखाडे आहेत. साधारणतः १७७२ पर्यंत त्यांचे एकत्रित स्नान होत होते. १७७२ मध्ये शाहीस्नानाचा पहिला मान कोणाचा या क्रमावरून सशस्त्र संघर्ष झाल्याने असंख्य साधू मारले गेले. तत्कालीन श्रीमंत सदाशिव रामभाऊ पेशवे सरकारने त्यात हस्तक्षेप केल्याने एका गटाने चक्रतीर्थ दुसऱ्या गटाने रामकुंडावर स्नान करण्याचा निवाडा दिला. असा उल्लेख पेशवे बखर (पृष्ठ क्र. ६८,६९) आणि मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष (पृष्ठ क्र. २६८) यात आहे. आजही ही परंपरा सुरू आहे. दुसऱ्या गटाच्या साधू-संतांच्या स्नानासाठी सन्मानाने दोन तासांचा वेळ मोकळा ठेवतात. देशात अलाहाबाद, उज्जैन आणि हरिद्वार येथे आजही स्नान एकाच वेळी होते. मात्र, साधूंचे दोन्ही गट स्वतंत्र तीरावर स्नान करतात.


कुंभ मेळ्यातील काही घडामोडी  

1) १७७२ मध्ये शाहीस्नानाचा पहिला मान कोणाचा यावरून झालेल्या सशस्त्र संघर्षात १२ हजार साधूंचा मृत्यू.

2) नागा साधूंबाबत आक्षेपामुळे ब्रिटिशांच्या हस्तक्षेपाने १७७५ ते १८२३ या कालावधीत सिंहस्थ स्थगित.

3) १८२३ पासून ब्रिटिशांनी सूर्यास्तापूर्वी नागा साधूंचे स्नान निश्चित केले.
4) ब्रिटिश चित्रकार जे.एम.डब्ल्यू. टर्नर याने रेखलेले हरिद्वार कुंभ मेळ्याचे चित्र (निर्मितिकाळ: अंदाजे .. १८५०)
 

Reference-
1) https://mr.wikipedia.org/wiki
2) https://kumbhnashik2015.blogspot.in/
3) https://maharashtratimes.indiatimes.com/
4) सिंहस्थ कुंभमेळा - लेखक पंडित हिंगे

काही छायाचित्रे