Tuesday, August 25, 2015

कण्हेरगड.....

कण्हेरगड.....

सातमाळ रांगेतिल आडवाटेवरचा एक किल्ला म्हणजे कण्हेरगड.कांचना मांचना किल्ल्यावरून आम्ही संध्याकाळी 8 वाजता कण्हेरवाडीत पोहचलो. वाडीतील सुखाराम लोखंडे यांच्याकडे एका रात्रिसाठी निवर्याची मागणी केली असता त्यांनी ती आनंदाने मान्य करुण आमच्या रात्रीच्या जेवनाची पण सोय केली. 4 दिवस नुसता मसाले भात खानारे आम्ही बेसन भाकरीवर अक्षरशा तुटून पडलो. जेवण झाल्यावरती आंगणातच पेटवालेल्या शेकोटि भोवती वाडीतील काही मंडळी आणी आम्ही गप्पा मारत बसलो. कण्हेरगडावरचा रामजी पांगेरा या किल्लेदाराचा  जो काही इतिहास माझ्या वाचनात आला होता तो मी त्यांना सांगितला. सन 1672 मध्ये दिलेरखान आणी बहादुरखान वेगवेगळ्या दिशेने स्वराज्यावर तुटून पडले होते. रामजी पांगेरा दिलेरखानाच्या सैन्यावर छापे मारुण आपल्या 800 मावळ्यांसह कण्हेरगडावर आले होते याच गडावर दिलेरखाना बरोबर झालेल्या लढाईत त्यांना वीर मरण आले होते. गप्पा मारता मारता 11 कधी वाजले कळलेच नाही
सकाळी सुखा मामा कडे चहा घेऊन वाडीतील दादू नावाच्या मुलाला बरोबर घेऊन किल्ला चढायला सुरुवात केलि 1.30 तासात आम्ही किल्यावर पोहचलो त्यातील अर्धा तास फ़क्त मुरामचा घसारा पार करण्यात गेला जो आपल्याला किल्ला चढताना मद्यभागी लागतो कनहरगडावर पोहोचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं दिसते. नेढ्याच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथा बराच प्रशस्त आहे.गडमाथ्यावर पाण्याची ६ ते ७ टाकी आहेत. महादेवाची पिंड आहे. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कड्यात खोदलेली आहे. गडावर वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडाचे दुसरे टोक हे धोडपच्या माची सारखेच आहे. गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या ,रवळ्या जवळ्या, धोडप, कंचना अशी संपूर्ण सातमाळ रांग दिसते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. कण्हेरवाडीतुन निघताना रात्रीच्या गप्पामध्ये सामील असलेली मंडळींचा निरोप घेतला आणी पाहूनचारा बद्दल सुखा मामाचे खूप खूप आभार मानले. एका गोष्टीच खूपच वाईट वाटल ते म्हणजे किल्ल्यावर युद्धाचे एक पर्व गाजविलेल्या रामजीच्या नावाची साधी पाटी सुद्धा नाही

जाण्याचा मार्ग: नाशिकवरुन मार्कंड़या आणी रावळ्या जावळ्याच्या खिंडी मधून कण्हेरवाडीला जाता येते

आपला
प्रविण गायकवाड़


 कण्हेरगड
 कण्हेरगडावरील नेढ




 धोडप












मार्कंड्या

Thursday, August 20, 2015

आहुपे घाट मार्गे - गोरखगड (९ तासांचा निसर्गरम्य प्रवास)

आहुपे घाट मार्गे - गोरखगड (९ तासांचा निसर्गरम्य प्रवास) (तारीख १५ आणी १६ ऑगस्ट २०१५)

नाने घाटा सारखा असलेला घाटमार्ग - आहुपे घाट याबद्दल थोडाफार वाचनात आल होत तसेच दुर्ग भटकंतीतील सवंगडी सुभाष कुचिक याच्याकडून खुपवेळा  ऐकल होत. ५-६ वर्षापूर्वी आहुप्याला गेलो होतो तेव्हा वेळे अभावी घाट मार्ग तसाच राहून गेला.
आहुपे घाट हे भीमाशंकर अभयअरण्यातील भट्टीच्या राणाच्या सानिध्यात असलेले नयनरम्य ठिकाण आहे. आहुपे घाटावरून आजूबाजूचे विहंगम दृश्य दिसते. आहुपे ते खोपिवली असा घाटमार्गाचा  प्रवास आताहि चालू आहे घाट मार्गामध्ये वाटसरुणां पानी पिण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तीन पाण्याच्या टाक्या पहावयास मिळतात तसेच दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्यांचे अवशेष सुद्धा  आहेत. घाट उतरत असताना समोरच असलेला गोरखगड आणि मछिंद्रगडाचा सुळका आपली  नजरच खिळवून ठेवतो. दोन तासाच्या उतरनी नंतर आपण एका नदीपात्रात येतो. नदी पार केल्यानंतर 100 मीटर वर एक वाट आपल्याला डाविकडे घेऊन जाते. ही वाट सरळ गोरख गडावर जाते. गोरखगड़ावारुन बाजूला सिद्धगड, मछिंद्रगड आणी समोर आहुपयाचे उंच उंच कड़े आणी दुर वर दिसणारा नानाचा अंगठा आपले लक्ष्य वेधुन घेतात. तस पहिला गेलतर 5-6 वर्षात आहुप्यात खुपच बदल झालेले दिसले. आश्रमशाळेच्या एकाशेडच रूपांतर तीन टोलेजंग इमारतीत झाल. कड्यावरती बाकडे दिसायला लागले. ग्रामस्तांनी पर्यावरण शुल्क सुरु केल. पण जुन्या मित्रमंडळीनी केलेल्या पाहुंचारामुळे माणुसकी शिल्लक असल्याची जाणीव सुद्धा झाली

आपला
प्रविण गायकवाड
1) आहुपे घाट मार्ग ….
2) काताळा मधील पाण्याचे कोरीव टाके
3) निसर्गाची किमया … हि गोम असावी का ??
4) टुमुकदार घुलेराव …
5) गोरखगडावरील एक क्षण ….
6) आहुप्यातील उंच कडे ….
7) आहुप्यातील उंचकड्याला आडलेले ढग
8) धबधबा ......